बारावीच्या निकालात नागपूर विभागात गोंदिया जिल्हा अव्वल; यंदाही मुलींचीच सरशी

गोंदिया जिल्ह्यात शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील शाळांचानिकाल सरस आहे. जिल्ह्यात तिरोडा तालुका बारावीच्या निकालात टॉप ठरला आहे. गोंदिया तालुक्याचा निकाल ९४.४२ टक्के, आमगाव ९२.०९ टक्के, अर्जुनी मोरगाव ९६.९८ टक्के, देवरी ९३.८८ टक्के, गोरेगाव ९१.६० टक्के, सडक अर्जुनी ८६.५१ टक्के, सालेकसा ९५.६१ टक्के, तिरोडा तालुक्याचा निकाल ९७.२१ टक्के लागला असून हा तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या निकालात गोंदियाजिल्ह्याने गौरवपूर्ण निकालाची परंपरा यावषर्ी ही कायम राखली आहे.बारावी परीक्षेदरम्यान कॉपी मुक्त अभियानाची कडक अमल बजावणी करण्यात आलीअसतानाही गोंदिया जिल्ह्याचा निकाल ९४.०४ टक्के लागला असून गोंदिया जिल्हा नागपूर विभागात प्रथम क्रमांकावर आहे. इयत्ता बारावीचा निकाल सोमवारी, ५ मे रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. उत्तीर्ण मध्ये नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली आहे. मुलींची टक्केवारी जास्त आहे.