जिल्हाधिकारी यांची परसटोला येथे आकस्मिक भेट

 दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय कोलते यांनी साकोली तालुक्यातील परसटोला गावाला आकस्मिक भेट दिली. यावेळी सरपंच हरिश्चंद्र दोनोडे यांनी ग्रामपंचायतच्या वतीने पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. परसटोला भेटीच्या वेळेस उपविभागीय अधिकारी अश्विनी मांजे तसेच नायब तहसीलदार शामराव शेंडे तथा महसूल विभागाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कोलते यांनी यावेळी विविध सुविधा कामे, तळ्यातील गाळ काढण्याचे कामतसेच गावातील इतर महत्वाच्या गोष्टींविषयी चर्चा केली व काही महत्वाच्या सुचना दिल्या. जिल्हाधिकारी कोलते यांनी परसटोला येथे दिलेल्या भेटीच्या वेळेस ग्रामस्थांनी आपली समस्या सुद्धा मांडली व लवकरच या समस्येचे निराकरण करण्यात येईल असे आश्वासन सुद्धा यावेळेस जिल्हाधिकारी कोलते यांनी ग्रामस्थांना दिले यावेळी सरपंच हरिश्चंद्र दोनोडे, ग्रामपंचायत अधिकारी धुर्वे, तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *