जिल्ह्यातून प्रथमच महिला बचत गटाला दिला गुजरीचा ठेका

दै. लोकजन वृत्तसेवा सानगडी :- येथील दैनिक गुजरी वसुलीचा कंत्राट यावेळी येथील अभिराज प्रभाग संघ या महिला बचत गटाला मिळाल्याने गुजरीमध्ये भाजी विक्रेते व इतर वस्तू विक्रेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. यापूर्वी ठेकेदारांकडून शासनाच्या निश्चित दरापेक्षा अधिकच पठाणी वसुली पासून दुकानदारांना मुक्ती मिळेल अशी आशा दुकानदारांनी व्यक्त केली आहे. अशा प्रकारचा वसुली कंत्राट महिलांना मिळाल्याची भंडारा जिल्ह्यातील ही पहिलीच बाब आहे हे येथे उल्लेखनीय आहे. दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मार्च या वर्षभराच्या कालावधीसाठी गुजरीतील बैठक दुकानदार आणि ट्रक, मेटाडोर, ट्रॅक्टर व बैल बंडीनेशेती उत्पादक भाजीपाला व इतर साहित्य गुजरी मध्ये आणणाऱ्या व विक्री करणाऱ्या वर ठरलेल्या शासकीय दराप्रमाणे कंत्राटदराने वसुली केली पाहिजे असा नियम आहे परंतु वसुली कंत्राटदार शासकीय दरापेक्षा अधिकची वसुली करत होते विरोध करणाऱ्यांचे काटे, वजन नियमबाह्यपणे जप्ती करून घेत होते व मनमानी पैसे वसूल करून परत देत होते.

यावर्षी मात्र महिला सशक्तीकरण योजना अंतर्गत महिलांना प्रोत्साहन करण्यासाठी सानगडी येथील दैनिक गुजरी वसुलीचे कॉन्ट्रॅक्टर सदर महिला बचत गटाला आल्याने या पूर्वी होत असलेले पठाणी वसुली संपुष्टात येईल अशी आशा गुजरी दुकानदारांनी व्यक्त केल्या. महिला बचत गटाला नियमाच्या अधीन राहून ही संधी महिलांना मिळाली म्हणून सरपंचा सविता उपरीकर, उपसरपंच भूमेश्वर ब्राह्मणकर, सुरेश झिंगरे, गोवर्धन इटवले यांनी प्रयत्न केले याप्रसंगी कुलदीप धकाते, सतीश खंडाईत, तसेच महिला भरपूर प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *