१ एप्रिल ते ३० जून या कालावधीत जिल्हाभरात पाणी तपासणी अभियान
केंद्र शासनाचे निर्देशानुसार दि. १ एप्रिल ते ३० जून २०२५ या कालावधीत पावसाळापूर्व रासायनिक तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्या निर्देशीत केलेल्या कालावधीत नळ पाणी पुरवठा योजनांचे स्त्रोत, शाळा, अंगणवाडी येथील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत पाणी गुणवत्ता शाखेच्या वतीने या कालावधीत मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे यांचे मार्गदर्शनात, प्रकल्प संचालक (जजीमि) माणिक चव्हाण यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांचे रासायनिक तपासणी पूर्ण करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.
तपासणी करण्यात येणाऱ्या स्त्रोतांतध्ये नळ पाणी पुरवठा योजनेचा स्त्रोत, त्यानंतर पहिला, मधला व शेवटचा नळ तसेच शाळा, अंगणवाडी येथील स्त्रोताचे पाणी नमुने प्रयोगशाळांना गोळा करायचे आहेत. त्यानंतर त्या स्त्रोतांच्या त्या नमुण्यांची तपासणी करून केंद्र शासनाचे पाणी गुणवत्ता संकेतस्थळावर नोंदी घेतल्या जाणार आहेत. पाणी गुणवत्ता तपासणीमध्ये दूषित आढळून आलेल्या स्त्रोतांवर प्रतिबंधात्मक उपाय योजना करून त्याच्यांही नोंद या संकेतस्थळावर घेतल्या जाणार आहे. शासकिय यंत्रणांनी सहभागी होऊन पिण्याच्या पाण्याची स्त्रोतांची रासायनिक तपासणी वेळेत पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन मिलिंदकुमार साळवे यांनी केले आहे.