कोषागार कार्यालयातील अधिकारी,कर्मचाऱ्यांनी मार्च एंडिगची कामे वेळेत केली पूर्ण

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- गेल्या १०-१५ दिवसापासून मार्च अखेरचे कामकाज सुरु होते. त्याचा शेवट काल दि ३१ मार्च २०२५ रोजी रात्री जवळपास १.०० वाजे पर्यंत जिल्हा कोषागार कार्यालय, भंडारा येथील सर्व अधिकारी/ कर्मचारी यांनी जिल्हा कोषागार अधिकारी मंगला डोरले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले. विशेष बाब म्हणजे कोषागारच्या विविध लॉगिन मध्ये तांत्रिक समस्या असतानाही सर्व विभागाशी योग्य समन्वय ठेवून विहित वेळेत देयके स्विकृती करून कोणत्याही विभागाचे अनुदान व्यपगत होणार नाही यांचे दक्षता घेण्यात आल्यामुळे कोणत्याही विभागाचे अनुदान व्यपगत झाले नाही.

तालुकास्तवरील उपकोषागारचे देखील कामे शासन आदेशानुसार विहित कालावधीत सर्व उपकोषागार अधिकारी यांनी यशस्वी पणे पार पाडले. कोषागारचे सर्व कामे संगणकीय प्रणाली मार्फत हाताळली जात असल्यामुळे तसेच सर्व प्रदान देखील बँकिंग प्रणाली द्वारेच केले जात असल्यामुळे विहित वेळेत कामे पार पाडण्यात कोषागार कार्यालय, भंडारा नेहेमी अग्रणी भूमिकेत असतो. काल रोजी कोषागार कार्यालयात सादर ऐकून ४४० देयकाचे प्रदान विहित वेळेत करण्याचे वरिष्ठ कार्यालयाकडूननिर्देश प्राप्त झाले असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रलंबित देयकांचा निपटारा करण्याचे काम सुरु आहे मागील आर्थिक वर्षात कोषागारात ऐकून २५८८५ देयके सादर झाली होते. त्यातील पारित देयकांचे प्रदान १००% लाि/श-र्ज्ञीलशी प्रणाली द्वारे थेट बँक खात्यात करण्यात आले आहे. कोषागाराकडून माहे ३१ मार्च २०२५ रोजी जवळपास १९ कोटी चे प्रदान करण्यात आले असून उर्वरित शिल्लक देयकांचे जवळपास एकूण १३२ कोटींचे प्रदान लवकरच करण्यात येणार आहे.

जिल्हा कोषागार अधिकारी मंगला डोरले यांच्या नेतृत्वाखाली कोषागारात वअधिनस्त असलेल्या उपकोषागारात अपुरे मनुष्यबळ असतानाही सांघिक कामकाम करून मार्च २०२५ अखेरची कोषागारातील कामे पार पाडण्यात आले. यात अंकेक्षण टीमचे सचिन मिलमिले, प्रशांत इंगळे, रमेश सहारक, पांडुरंग नंदनवार, मोहन काळे, योगेश शिंपी, आशा साखरवाडे, ज्ञानेश्वर वरठी, विद्या वाकडे, धनराज बोरकर, पंकज डंबाले, सचिन भरणे यांनी सुरळीत कामकाज पार पाडले तर धनादेश शाखेत आशिष सिसिकर, आदित्य बोन्द्रे, सोनम मंडपे यांनी देयके विहित वेळेत स्विकृती करून तसेच आक्षेपित देयके परत केली तसेच देयकांचे प्रदानाची कार्यवाही तसेच तांत्रीक बाबीसंबंधी समन्वय ठेवून सतिश मंगर यांनी जिल्हा कोषागार अधिकारी मंगला डोरले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले. वित्त विभागाकडून पारित आदेशाची अंमलबजावणी वेळेत केल्यामुलळे जिल्हा प्रशासनातील विविध शासकीय विभागांकडून, अधिकारी कर्मचारीकडून कोषागारात भेट देऊन समाधान व्यक्त करून कोषागार टीमचे आभार व्यक्त केले. तसेच सर्व प्रदाने वेळेत करून कर्तव्य चोखपणे बजावल्याचे समाधान सर्व कोषागार/उपकोषागारात कार्यरत सर्व अधिकारी/कर्मचारी यांना मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *