घनकचरा सफाई मजुरांना दोन महिन्यापासून वेतन नाही

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- घनकचरा सफाई मजुरांना कंत्राटदाराने दोन महिन्यापासून मजुरी दिली नसल्याने हातावर कमावणाऱ्या या मजुरावर उपासमारीची वेळ आलेली असून आम्हाला त्वरित दोन महिन्याची मजुरी मिळवून द्यावी यासाठी या मजुरांनी या क्षेत्राचे आ. राजू कारेमोरे यांना भेटून साकडे घातले आहे. मागील तिन वर्षापासून मोहाडी नगरपंचायत विविध कारणास्तव चर्चेत आहे. घनकचरा व्यवस्थापनांत कार्यरत सफाई कामगारांना कोणत्याही बाबीची तक्रार केल्यास कामावरून काढण्यात येईल असे धमकवण्यात येत असल्याचे या कामगारांनी जनसंपर्क कार्यालयात आमदारांना भेटुन सांगीतले. तसेच त्यांना मागील दोन महिन्या पासून मजुरीही देण्यात आलेली नाही.

याशिवाय किमान वेतनानुसार मजुरी न देणे,कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कंत्राटदाराकडून भरण्यात येत नाही, विनाकारण काही कारण नसताना हेतू परस्पर कामावरून काढून टाकणे, सफाई कामगारांना कंत्राटदाराकडून सफाई साठी लागणारे हातमोजे, फावडे, फिनाइल अशा सफाईसाठी लागणारे वस्तू सुध्दा देण्यात येत नाही. कंत्राटदाराकडून सफाई मजुरांचा विमा काढण्यात आलेला नाही. सफाई करत असताना कुठल्याही प्रकारची घटना घडल्यास सफाई कामगारांचा विमा नसल्यामुळे त्यांना कुठेच वैद्यकीय दावा मिळू शकत नाही. किमान वेतनानुसार मजुरी देण्यात यावी, किमान वेतनानुसार भविष्य निर्वाह निधीचे पैसे जमा करण्यात यावे, सर्व मजुरांचा विमा काढण्यात यावा, सफाई करताना लागणारे साहित्य कंत्राटदारांनी पुरविण्यात यावे अश्या अनेक समस्यांचे निवेदन तुमसर मोहाडीचे आमदार राजू कारेमोरे यांना देण्यात आले.

कंत्राटदाराने लवकरात लवकर मागण्या पूर्ण न केल्यास सर्व मजुरांचा काम बंद आंदोलन करण्यात येईल असे ठरविण्यात आले. निवेदन देतांना नागोराव पराते, लीलाधर श्रीपाद, सुखरामजिभकाटे, दिनेश महाल, सुनील सोनवणे, चंदन वासनिक, दिलीप निमजे, विठ्ठल कुंभारे, कृष्णा बारई, ॠषी गभने, कमलेश बारापात्रे, ललित उज्जैनवार, शुभम मोगरे, मंगेश बारई, राजेश पुडके, सुनील बाणासुरे, मोहन निमकर, दशरथ सोनकुसरे, जागेश्वर बुरडे, आकाश कंगाले, अरविंद निखारे, स्वप्निल डुमरे, श्याम बुरडे, महेश थोटे, कार्तिका बावणे, पुनाबाई कलोसे, ज्योती कलोसे, सीमा उज्जैन वर, दीपविज्ञा डोंगरे, सुनील कलोसे, लखन बुरडे, संजय भेलावे, रेखा डेकाटे, कचराबाई सोनवणे, उषा पराते, हिरा नंदनवार, दुर्गा पात्रे, कमलेश पात्रे आदी अनेक कामगार उपस्थित होते. येथील सुभाष गायधने, मनोहर हेडाऊ, सुभाष भाजीपाले, शैलेश गभने, पिंटू तरारे, विकास कारेमोरे, रवी देशमुख यांनी त्यांना पाठींबा दर्शविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *