जिल्ह्यात शांतता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी सहकार्य करा
भंडारा जिल्ह्यात सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त नेमण्यात आलेला असून सर्व पोलीस दल सतर्क आहे. तसेच सोशल मिडीया मॉनिटरींग सेल स्थापन करण्यात आला असून सर्व व्हॉट्सॲप, फेसबुक, व्ट्टि, इन्स्टाग्राम व इतर सोशल मिडीया माध्यमांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. याव्दारे भंडारा जिल्ह्यातील सर्व नागरीकांना निर्देश देण्यात येते की, नागपुर शहरातील झालेल्या घटनेच्या संदर्भाने खोटे मॅसेज व अफवा सोशल मिडीयावर पसरविण्यास तसेच दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करणाऱ्या व संबधीत ग्रुप ॲडमीन यांना जबाबदार धरण्यात येईल. असे कृत्य करणाऱ्यास महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच भारतीय न्याय संहिता प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. तरी सर्व व्हॉट्सॲप ॲडमीन यांना सुचित करण्यात येते की, आपण सर्वांनी भंडारा जिल्ह्यात शांतता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलीस दलास सहकार्य करावे.