पंचायत राज व्यवस्थेमुळे गावांचा विकास साधला- लायकराम भेंडारकर
भेंडारकर पुढे बोलताना म्हणाले की,भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्याची सुमारे ८२ टक्के लोकसंख्या खेडे गावात राहते,या सर्व ग्रामपंचायती स्वयंपूर्ण व्हाव्यात असा आमचा निर्धार आहे.त्यामुळे पाटोदा ग्रामपंचायती प्रमाणे तुम्हीही शासकीय योजनानंच्या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी बोलताना मुकाअ मुरुगानंथम म्हणाले की, आता ग्रामपंचायती राज्यकारभाराच्या घटक झाल्या आहेत.ग्रामीण भागातील आरोग्य, साफसफाई, स्वच्छता, पाणी पुरवठा व शिक्षण या दृष्टीने ग्रामपंचायतीना अधिकार मिळाले असून त्याची जबाबदारी सरपंचांवर आहे. ग्रामपंचायतीना शासना कडून पुरेसा निधी मिळत असल्यामुळे आपले गांव स्वयंपूर्ण करा असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी बोलताना उपाध्यक्ष श्री हर्षे यांनी सरपंचाना मार्गदर्शन करताना, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमांचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे सांगितले. या प्रसंगी बोलताना सांगलीचे विस्तार अधिकारी यांनी पंचायत विकास निर्देशांकाची विस्तृत माहिती देऊन शास्वत विकास ध्येयाच्या ९ संकल्पनांची माहिती दिली. पाटोदा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पेरे पाटील म्हणाले की, आजच्या काळात माणसाचे आयुष्य कमी आणि देशावरचे कर्ज अधिक होत आहे. त्यामुळे राजकारण बाजूला सारून आयुष्य वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, अशी विनंती त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की, आपल्या ग्रामपंचायतीचे ४० लाख रुपयाचे उत्पन्न असून यामुळे ग्रामपंचायत सुजलाम सुफफलाम झाली आहे.
ग्रामिणाना आरोग्याचा सल्ला देतांना श्री पाटील म्हणाले की,आपलं गांव स्वच्छ ठेवा,पिण्याचे स्वच्छ पाणी तसेच शिक्षण यावर भर देण्याची गरज असून म्हाताऱ्या मंडळींवर प्रेम करा. संत तुकाराम महाराजांचे सरपंचाना अभंग सांगून, केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे असे आव्हान पेरे पाटील यांनी केले. याप्रसंगी शासनाकडून पुरस्कार प्राप्त केलेल्या,पंचायत समिती तिरोडा, ग्रामपंचायत भजेपार, डव्वा,दररेकसा, शिवणी, गंगाझरी, नहरटोला,देवलगावं, भररेगाव, कमरगाव, कुंभीटोला, कातूलर्ी, बोदरा, खोडसीवणी, तिरखेडी,अंभोरा आदि ग्रामपंचायतींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माझी वसुंधरा, पाणी गुणवत्ता आदि विषयावर सादरीकरण करण्यात आलं. याप्रसंगी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, अर्जुनी मोरच्या गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी एस. आय. वैद्य यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
महापुरुषांच्या छायाचित्रांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी आरोग्य विभाग आणि बचत गटांच्या महिलांनी स्टॉल्स उभारले होते.कार्यक्रमाचे संचालन करून विस्तार अधिकारी वैशाली खोब्रागडे आणि माहिती,शिक्षण व संवाद तज्ञ अतुल गजभिये यांनी उपस्थितांचे आभार मानले.याप्रसंगी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील सरपंच,उपसरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मुरूगानंथम यांच्या मार्गदर्शनात, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासनिक, गुणवंत ठाकूर, पंकज पटेल, दिलीप चौधरी, सुनील चव्हाण, कविता राठोड, ज्ञानेश्वर कानडे, श्याम समरीत,राजश्री गौतम, पृथ्वीराज कोल्हटकर, नरेश लांजेवार, प्रकाश तिरेले, रोहित बन्सोड, जगमोहन दास तसेच विस्तार अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.