अवैध रेतीचा साठा आढळल्याने घरकुल लाभार्थ्यांना ९ ब्रास रेती वाटप

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- पालोरा साझाचे मंडळ अधिकारी संगीता हलमारे यांना ढिवरवाडा परीसरात अवैध रेतीचा साठा जमा करून अवैधरित्या विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली असता मंडळ अधिकारी संगीता हलमारे, तलाठी कटरे, कोतवाल अनिल वैद्य, मुलचंद उरकुडे यांनी घटनास्थळी मौका पाहणी केली. त्या ठीकाणी अवैध रेतीचा साठा आढळून आल्याने त्या रेतीचा पंचनामा करून ती रेती घरकुल लाभार्थ्यांना ९ ब्रास रेती वाटप करण्यात आले. काही सुत्रांकडून सांगण्यात आले की रात्रीच्या वेळी नदी घाटातून अवैध रेती उत्खनन करून शेतामध्ये साठा जमा करून विक्री केले जात असल्यामुळे मंडळ अधिकारी संगीता हलमारे यांनी पालोरा, खडकी, कान्हळगाव, बोरगाव, ढिवरवाडा परीसरात अवैध रेती वर आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत असल्यामुळे रेती माफी यांचे धाबे दणाणले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *