
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राज्य शासनाने १०० दिवसांच्या कृती आराखड्याबाबत जिल्हयातील महत्वाचे प्रश्न असल्यास त्याचा मंत्रालयीन पातळीवर पाठपुरवठा करण्याचे आश्वस्त करत, या शंभर दिवसात ९ प्रमुख मुदयाखेरीज वैशीष्टयपुर्ण उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश अतिरीक्त मुख्य सचिव उर्जा तथा पालक सचिव आभा शुक्ला यांनी आज यंत्रणांना दिले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींदकुमार साळवे यासह सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी महाउर्जा विभागाचे सौर उर्जीकरणाचे सादरीकरण महाउर्जा तर्फे करण्यात आले. सौर उर्जीकरणासाठी शासन आग्रही असून शेतीला सुध्दा सौर उर्जेव्दारे विदयुत पुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. लोकाभिमुख होऊन कामकरण्याचे निर्देश पालक सचिवांनी दिले.