ग्रामपंचायतला विश्वासात न घेता आपल्याच मर्जीने तयार केला सिमेंट रस्ता
त्यामध्ये सुध्दा अंदाज पत्राकातील तरतूदी नुसार कामे होत नाहीत आणि संबंधित विभागाचे कनिष्ठ अभियंता व अधिकारी कंत्राटदाराची बाजु सावरण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. बोंडे येथील काम नियोजनानुसार झाले नसल्याची माहिती खडकी येथील सरपंच अश्विन बागडे यांना विचारण्यात आले असता त्यांनी काम सुरू केव्हा झाला याची आम्हाला कल्पना नाही. जेव्हा मला काम झाले असल्याची माहिती मिळाली असता तेव्हा प्रत्यक्षात कामाचे ठिकाणी गेले असता काम दुसऱ्याच ठिकाणी झाले असल्याचे दिसून आले असल्याचे सांगितले.
संबंधित विभागाचे कनिष्ठ अभियंता यांना फोनव्दारे कळविले असता त्यांनी मला पण कामाची माहिती नाही, आम्हीप्रत्यक्षात झालेल्या कामावर जाऊन चौकशी करू असे सांगितले. त्यानंतर घटनास्थळी सिर्मेंट रस्त्याची पाहणी केले नंतर तो सिर्मेट रस्ता लोकेशनच्या ठीकाणाहून न करता दुसऱ्या ठीकाणाहून करण्यात आल्याचे स्पष्ट दिसले. त्यामुळे ठेकेदाराकडून लोकेशनच्या ठीकाणाहून सिर्मेंट रस्ता करून घेणार काय? की काम न करता झालेल्या सिर्मेंट रस्त्याचे बिल तर काढणार नाही, याकडे बोंडे व खडकीवासियांचे लक्ष वेधले आहे.