धनेंद्र तुरकर यांचा शेकडो खंदे समर्थक कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश
या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे माजी राज्यमंत्री तथा विद्यमान विधानपरिषद सदस्य डॉ. परिणयजी फुके यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीचे माजी शिक्षण सभापती तथा तालुका अध्यक्ष धनेंद्र तुरकर, अविनाश सोनवाने, सरपंच श्रीधर हटवार, सरपंच कोमल वरखडे तसेच अनेक सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यानी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे, तुमसर-मोहाडी विधानसभा प्रमुख इंजी. प्रदीप पडोळे यांच्या प्रमुख उपस्थितित पक्ष प्रवेश केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बंडूभाऊ बनकर, दिलिप सार्वे, संदीप ताले, उपसभापति सुभाष बोरकर, जिल्हा महामंत्री कुंदा वैद्य, प्रदेश सचिव गिताताई कोंडेवार, तुमसर तालुका अध्यक्ष काशीराम टेंभरे, मोहाडी तालुका अध्यक्ष भगवान चांदेवार, बाजार समितिचे सभापति भाऊराव तुमसरे, राजेंद्र पटले, मुन्नाभाऊ पुंडे मयूरध्वज गौतम, गजानन निनावे, बोलाभाऊ तुरकर यांचे सह जिल्हा, तालुका, शहर, जिल्हा परिषद क्षेत्र प्रमुख, शक्ति केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व भाजप कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.