शिव जन्मोत्सव व बक्षिस वितरण

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- हिंदवी प्रतिष्ठान व शिव स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने शिव जन्मोत्सव साप्ताहिक कार्यक्रम घेण्यात आले आहे. त्या साप्ताहिक कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी शिव जन्म उत्सव व बक्षीस वितरणच कार्यक्रम गांधी चौक भंडारा येथे घेण्यात आला व वर्धा येथून आलेल्या बाल कारकारांची जानता राजा हा नाट्य प्रयोग पण सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला लोकांचे खूप चांगले प्रतिसाद मिळाले या कार्यक्रमात ३० स्पर्धकांना बक्षीस वाटप करण्यात आले. त्या सोबतच शिवाजी महाराज जयंती निमित्त घेण्यात आलेल्या चित्र रथ स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून हिंदवी प्रतिष्ठान चे अध्यक्ष व या कार्यक्रमाचे सह आयोजक जॅकीभाऊ रावलानी, शिव स्वराज्य प्रतिष्ठान चे सचिव निलेश सोनकुसरे, संजयजी एकापुरे, ॲड. किशोर लांजेवार सर, शेखर गभने (बाळा भाऊ), नितीनजी गायधने, नूतन कन्या शाळेचे प्राचार्य नीलू तिडके मॅडम, पतंजली चे खोब्रागडे सर. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदवी प्रतिष्ठान चे अध्यक्ष जॅकीभाऊ रावलानी, शिव स्वराज्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष विपीन वडकर, उपाधक्ष्य पंकज ठवकर, सचिव निलेश सोनकुसरे, सहसचिव अतुल गेडाम, डॉली शर्मा, अमोल बेस, मोहित वडतकर, प्रतीक लेंडे, हर्षल वासनिक, केयुर बांते, रजत खोब्रागडे, मनीष, अभिषेक ठलाल, वाडीभस्मे, तेजस गेडाम, प्रथम खेडकर, आभिषेक अंभोरकर, सागर रायपूरकर, राहुल गेडेकर, आशिष चेतुले, योगेश गायधने, योगेश पंधरे आणि विशेष सहकार्य म्हणुन रायझिंग झुंबा व क्लासेस चे सदस्य, पराग भाऊ लेंडे मित्र परिवार, युथ फार नॅशन तसेच विविध शालेय शिक्षक व पालकांनी पण या करक्रमाला पुढे येऊन सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *