
दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा ः- मोहाडी तालुक्यातील पालोरा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांना आज दि २२ फेब्रुवारी २०२५ रोजी ग्रामपंचायत येथे प्रधानमंत्रीआवास योजनेचा ग्रामिण टप्पा दोन मध्ये असलेल्या लाभार्थ्यांना सरपंच शिल्पा तुमसरे यांचे हस्ते प्रमाण पत्र वाटप करण्यात आले असून ६७ लाभार्थींच्या बैक खात्यावर पंधरा हजार रुपये जमा करण्यात आले आहे. यावेळी नोडल अधिकारी कमलेश दुपारे, उपसरपंच रत्नदिप मेश्राम ग्रा. पं. सदस्य श्याम तुमसरे, किशोर अतकारी, चंद्रकला कुकडे,रोजगार सेवक बळीराम अतकारी, ग्रा. पं. लिपिक गोविंदा बांते, कर्मचारी विलास खराबे, कैलास धुर्वे,आपरेटर अमिता रोकडे, वृषभ काळे, अशा वर्कर उषा बावनकर, माया खराबे, करिष्मा चिमणे,विणा टिचकुले व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.