करडी येथे मॅराथान स्पर्धेत दोनशे युवकांनी घेतला सहभाग

 दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- टैकस्टार क्रीडा मंडळ करडी व पोलीस स्टेशन करडी यांच्या संयुक्त विद्यमाने दि १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी मॅराथान स्पर्धेचे करण्यात आले होते. खुला गट पुरूष करीता ८ कि. मि. रनिंग, १८ वर्षाखालील मुला करीता ५ कि.मि., १४ वर्षाखालील मुलाकारीता ३ कि. मि., ४० वर्षांवरील पुरुषा करीता २ कि.मि. तसेच १८ वर्षा खालील मुली करीता ५ किलो मिटर, १४ वर्षाखालील मुली करीता ३ कि.मि. व ३० वर्ष महीलांकरीता १ कि. मि. रनिंग मारणे होते.

यात नागपूर, वर्धा, भंडारा जिल्ह्यातील मुला मुलींना सहभाग घेतलेला. वर्धा येथील युवकांनी प्रथम क्रमांक पटकावला. सर्व क्रमांक पटकविलेल्या मुला मुलींना जि. प. सदस्य महादेव पचघरे, ठाणेदार सुधीर बोरकुटे, पं. स. सदस्य प्रिती शेंडे, निशिकांत इलमे यांचे हस्ते ट्राफी व पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. करडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधीर बोरकुटे व प्रिती शेंडे यांनी हिरवी झेंडी दाखवून मैराथान स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. मॅराथान स्पर्धेसाठी करडी येथील युवक व करडी पोलीसांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *