शिवजयंतीनिमित्त अख्खा जिल्हा झाला “भगवामय’
शहरातील तरुण मंडळांनी चौक सुशोभित करून, मंडप कमानी उभारून, शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. विविध संस्था, शाळा, महाविद्यालयातून छत्रपतींच्या चरित्रावर आधारित व्याख्याने आयोजित करण्यातआली होती. ध्वनिवर्धकावर पोवाडे गायले जात होते. वाहनांवरही भगवे झेंडे लावून युवक उत्साहात फिरत होते. अवघे शहरच नव्हे तर लहानमोठे गावे भगवेमय झाले. गावोगावी शिवजयंतीनिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी गावातून शिवरॅली काढण्यात आली. यावेळी डि. जे. च्या तालावर तरुणाई भिरकली. या रॅलीतून हिंदू-मुस्लिम-बौद्ध धर्मियांचीएकदा दिसून आली. रॅलीतील लोकांचे मुस्लिम व बौद्ध बांधवांनी स्वागत केले. काही ठिकाणी शरबत वितरणही करण्यात आले. दरम्यान शिवजयंतीनिमित्त शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त होत.