राज्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा; राज्यमंत्री योगेश कदमांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, पुढील काही दिवसात….
मुंबई:- इराण-इस्रायल संघर्षाचे पडसाद आता राज्यासह देशात उमटू लागले असून त्याचा थेट परिणाम एलपीजी पुरवठ्यावर दिसू लागला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे देशभरातील हॉटेल, रेस्टॉरंट तसेच फूड इंडस्ट्रीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
पुरवठा लांबणीवर पडल्यास येत्या काही दिवसांत हा उद्योग अडचणीत येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील २० टक्के हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढील तीन दिवस असाच गॅसचा तुटवडा सुरू राहिल्यास मुंबईतील ५० टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता आहे. आता या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम यांनी मोठं वक्तव्य केलंय.









