अवैध वाळू व्यवसायिकांच्या विरोधात जिल्हा काँग्रेसचा एल्गार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील वाळूचा मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उपसा करून त्याची वाहतूक करण्यात येते. ही वाहतूक करणारे ट्रॅक्टर, टिप्पर हे भरधाव वेगाने जात असल्याने अनेकदा अपघातही घडलेले आहेत. यात काहींना प्राण गमवावे लागले तर काहींना कायमचे अपंगत्व झाले. गरजू घरकुलधारकांना हक्काची वाळू मिळत नसताना जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी होत असल्याने काँग्रेसने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्ह्यातील अवैध वाळूचा उपसा बंद करून त्याची होणारी वाहतूक तातडीने बंद करावी अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची व पोलीस विभागाची पोलखोल करेल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना व पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून काँग्रेसने दिला आहे.

खासदार प्रशांत पडोळे, आमदार अभिजीत वंजारी, भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष कविता उईके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, काँग्रेसचे प्रदेश सचिव राजू पालीवाल यांच्या नेतृत्वात आज भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आला. यावेळी शिष्टमंडळांसोबत जिल्हाधिकारी, भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी चर्चा केली. यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणाऱ्या खासदार प्रशांत पडोळे आणि आमदार अभिजीत वंजारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना व पोलीस विभागाला धारेवर धरले. पुढील ४८ तासात भंडारा जिल्ह्यातून होणारी अवैध वाळू वाहतूक पूर्णपणे न थांबविल्यास काँग्रेसच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला.

दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास त्याला महसूल आणि पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा निर्वाणीचा इशारा यावेळी शिष्टमंडळाने प्रशासनालादिला. यावेळी शिष्टमंडळात प्रामुख्याने माजी आमदार अनिल बावनकर, सभापती नरेशईश्वरकर, सभापती शितल राऊत, प्रमोद तितिरमारे, धनंजय तिरपुडे, रमेश पारधी, अमरनाथ रगडे, गजानन झंझाड, पवन वंजारी,दिला. यावेळी शिष्टमंडळात प्रामुख्याने माजी आमदार अनिल बावनकर, सभापती नरेशईश्वरकर, सभापती शितल राऊत, प्रमोद तितिरमारे, धनंजय तिरपुडे, रमेश पारधी, अमरनाथ रगडे, गजानन झंझाड, पवन वंजारी,शंकर राऊत, विजय शहारे, बाणासुर खडसे, राजेश हटवार, अमित खोब्रागडे, सुरेश मेश्रामप्रेमदास वणवे, लालचंद लोथे, प्यारेलाल वाघमारे, योगराज झलके, कान्हा बावनकर, विनीत देशपांडे, विजय कापसे, मोहपतझंझाड, कैलास मते, उमेश मोहतुरे, देवेंद्र शहारे, हरीचंद्र बाभरे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *