
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर रोड रेल्वे कार्यालयात खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी तुमसर रोड रेल्वे संबंधी प्रमुख समस्यांबाबत बैठक घेतली. या बैठकीत तुमसर रोड गेट क्रमांक ५३२ वरील रेल्वे फाटक कायम बंद करण्याचे आदेश ताबडतोब रद्द करण्याचे निर्देश दिले. देव्हाडी येथील ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय रेल्वे प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे निर्णय घेऊ नये, असे खासदारांनी सांगितले. यावेळी खासदारांनी रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा प्रश्न तत्काळ निकाली काढून द्यावा असे आदेश दिले. तसेच देव्हाडी येथे सुरू असलेल्या क्लेरियन ड्रग्स कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या रसायनयुक्त दूषित पाणी कायमस्वरूपी बंद करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे सूचना दिल्या त्याचप्रमाणे कारखान्यात अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्देश दिले यादरम्यान कारखान्यातील कामगारांशी संवाद साधून त्यांचे समस्या जाणून घेतली. यावेळी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे विभागप्रमुख अमित एच. मेश्राम, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शैलेश पडोळे, सरपंच आशिष टेम्भुरकर, जिल्हापरिषद सदस्य राजेश सेलोकर, श्याम नागपूरे, विनोद कोकुडे, गजानन लांजेवार, संतोष लांजेवार, जवाहर कुंभलकर, संदीप वाट, राजू ठाकूर, संजय बडवाईक यासह ग्रामस्थ उपस्थित होते.