२३ लाख रुपयाची घरफोडी करणाऱ्यास अटक
दै. लोकजन वुत्तसेवा भंडारा :- स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस स्टेशन भंडारा येथील दोन गुन्हे उघडकीस आणलेले असून एकूण २३ लाख रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रोशन सेवकदास मेश्राम, वय ४१ वर्ष, राहणार-गिट्टीखदान नागपुर असे आहे. त्याच्या ताब्यातून सोन्याचे दागिने, ज्युपीटर मोपेड व रोख रक्कम असा एकूण २३ लक्ष रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रकरण असे की, दिनांक ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी एका अनोळखी चोराने महेश सुरेश मंत्री रा. भंडारा यांचे राहते फफूलॅट मधून एका अनोळखी इसमारने समोरील दाराचा कुलुप तोडून आत प्रवेश कडून लक़डी कपाटात ठेवलेले नगदी रोख रक्कम व दागीने असा एकूण २८ लक्ष रुपयाचा ऐवज चोरून नेला होता. त्यांच्या तक्रारीवरूर्न पोलीस स्टेशन भंडारा येथे सदरचा गुन्हा दाखल करण्यातआला. त्याअनुषंगाने पोलीस स्टेशन भंडारा व स्थानिक गुन्हे शाखा येथील पथक यांचे कडून अनोळखी आरोपीचा शोध सुरू असता पोलीसांनी गोपनिय विश्वसनीय माहीती वरून पोलीस स्टेशन गीट्टीखदान, नागपुर येथील सराईत आरोपी रोशन सेवकदास मेश्राम याला संशयाचे आधारे त्याची ओळख पटवुन त्याला त्याब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्यागे गुन्हयाची कबुली दिली.
गुन्हयाचे तपासी अधिकारी सपोनि. नितीन मदनकर व पोलीस स्टेशन भंडारा येथीलपोलीस स्टॉप यांनी आरोपीला अटक करून त्याचे कडून गुन्हयात चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला. आरोपीची पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करून आरोपीला अधिक विचारपुस केली असता आरोपीने यापूर्वी दिनांक२८ जानेवारी २०२५ रोजी सुध्दा भंडारा शहरात घरफोडी केल्याचे सांगीतले असल्याने सदर गुन्हयातील सुध्दा आरोपीने चोरी केलेला एकुण २५ हजार रूपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर, सहा पो. नि. भालेराव, भंडारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक गोकुळ सुर्यवंशी पोस्टे भंडारा, सहा. पो. नि. नितीन मदनकर व त्यांच्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांनी केली.