सिरसोलीत ॲपल शेतीचा पहिला प्रयोग
२०२१ ला त्यांनी दोन एकरात ॲपल शेतीचा पहिला प्रयोग केला. ॲपल फळाच्या शेतीला हवामान थंड असावा लागतो. परंतु विदर्भासारख्या हॉट टेंपरेचर मध्ये आपण ॲपल ची शेती करू शकतो यासाठी त्यांनी हिमाचल प्रदेश येथे जाऊन हिरमण शर्मा यांची ॲपलची नर्सरी पाहिली. तिथे जाऊन व्यापारी शेती विषयीची माहिती घेतली. हिरमन शर्मा यांनी एच आर एम याॲपलच्या जातीची उत्क्रांती केली. ४५ ते ४८ सेल्सियस तापमानात एच आर एम जातीचे ॲपल तयार होऊ शकतात. बाबू कस्तुरे यांनी हिमाचल प्रदेश मधून ॲपलची चारशे रोपे आणले. चारशे ॲपल झाडांची लागवड केली.
मात्र रानडुकरांनी २०० झाडे जमीनदोस्त केली. आता त्यांच्या शेतात १७५ ॲपलची झाडे उभी आहेत. पहिल्याच वर्षी त्या ॲपलच्या झाडांना फुलोरा व फळे आले होते. परंतु ते पहिले फळ तोडावे लागले होते. काहींनी तर झाडांची फळे तोडून खाल्ली. आज घडीला त्यांच्या शेतात असलेल्या ॲपलच्या झाडांना फुलोरा आला आहे. तसेच काही झाडांना ॲपल ही लागलेली आहेत. बाबू कस्तुरे या प्रगत शेतकऱ्यांनी ॲपलच्या शेती शिवाय चार एकरात मिरचीचे पीक घेतले आहे. तर दहाबारा एकरात भाताची शेती लावली होती. तथापि, दहा वर्षात पहिल्यांदाच भाताची शेती फायद्याचे ठरल्याचे सांगितले.