अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा
या सभेला मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन राज्य अध्यक्ष कॉ. दिलीप उटाणे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ग्रॅज्युटी व दरमहा पेन्शन लागू करा अशी मागणी करत शासनाने मागील जानेवारी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी, उच्च न्यायालय गुजरात यांनी दिलेल्या निर्णयानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या दर्जाआजारपणाचा रजा इत्यादी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय मागण्यांचे निवेदन जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय जोले यांना देऊन चर्चा करण्यात आली स्थानिक मागण्या पंधरा दिवसात निकाली काढण्याचे आश्वासनउपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा कार्यक्रमाधिकारी संजय जोले यांनी दिले.
इत्यादी विविध मागण्यावर चर्चा करण्यात आली तसेच राज्यशासनाने दिलेल्या आश्वासन पाडले नाही तर तीन मार्च २०२५ रोजी मुंबई विधानसभेवर मोर्चा काढण्यात येईल असा निर्णय जाहीर करण्यात आला. मोर्चाला मंगला गजभिये, अलका बोरकर, रिता लोखंडे, मंगला रंगारी, रेखा टेंभुर्णे, सुनंदा चौधरी, गौतमी मंडपे, कुंदा भदाडे, छाया क्षीरसागर, गौतमी धवसे, अनिता घोडीचोरे, छाया गजभिये इत्यादींनी आपले विचार व्यक्त केले. मोर्चात जवळपास १५००अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते. अशी माहिती युनियनचे जिल्हा कार्याध्यक्ष व आयटकचे जिल्हा सचिव कॉ. हिवराज उके यांनी दिली.