रस्ते महामार्गासाठी जमीनी देण्यास शेतकऱ्यांचा नकार

दै. लोकजन वुत्तसेवा सिल्ली/आंबाडी :- तालुक्यातील मानेगावं, बोरगाव (बुज .) जवळून नागपुर-गोंदिया प्रवेश नियंत्रीत शिघ्र संचार द्रुतगती महामार्गाच्या सावरखेडा इंटरचेज पासून गडेगांव पर्यंत या भंडारागडचिरोली जोड रस्त्याच्या बांधकामासाठी मानेगावं, बोरगावं येथील गट क्रं. ११३ व ११४ येथील शेतजमीन अधिनियमाच्या कलम ७ अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग ८ अ नुसार अधिनियम १९५५अन्वये कलम १५ (२) अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली. विशेष महामार्ग बांधकाम जमीनी अधिग्रहण हरकती नोंदविण्यासाठी गुरुवारी एसडीओनी शेतकऱ्यांना कार्यालयात बोलावले.मात्र कुटुंबातील एका सदस्याला आधी सरकारी नोकरी दिल्याशिवाय रस्ते बांधकामासाठी जमीनी देण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला आहे.

राष्ट्रीय गोसे खुर्द प्रकल्पात बोरगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतजमीनी आणि घरे यापुर्वीच संपादित झाल्या असून गावाचे नवीन ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले. याशिवाय टेकेपार उपसा सिंचनासाठी शेतकऱ्यांच्या जमीनी घेण्यात आल्या.त्यामुळे शेतकरी भुमीहिन होण्याच्या मार्गावर असून थोडीफार शिल्लक असलेल्या शेतजमीनीवर कुटुंबाचे कसे-बसे उदरनिर्वाह होत आहे. मात्र आता पुन्हा सिघ्र संचार द्रुतगती महामार्गाच्या बांधकामाकरीता उरलेल्या जमीनी संपादित केल्यास शेतकऱ्यावर बेरोजगारी व उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे जमीनी अधिग्रहित करण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी. अन्यथा आमच्या जमीनी संपादित करू नका, असे शेतकऱ्यांनी उपविभागीयअधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *