भंडारा जिल्ह्याच्या २३७ कोटीच्या प्रारुप आराखड्यास मंजूरी

दै. लोकजन वुत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्याच्या सन २०२५- २६ यावर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या २३७ कोटीच्या प्रारूप आराखडयास आज जिल्हा नियोजन समितीने मंजूरी दिली. वस्त्रोद्योग मंत्री मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. जिल्हा नियोजन समितीची बैठक आज जिल्हा नियोजन भवन येथे पार पडली. आजच्या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा कविता उईके, आ. नाना पटोले, आ. परिणय फुके,आ. नरेंद्र भोंडेकर, आ. राजू कारेमोरे, आ. अभिजीत वंजारी, जिल्हाधीकारी डॉ. संजय कोलते, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, पोलीस अधीक्षक नुरुल हसन आदींची उपस्थिती होती.

जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ अंतर्गत सर्वसाधारण योजनेकरिता रूपये २४६.०० कोटी, अनुसुचित जाती उपयोजना करिता रूपये ५३.०० कोटी व आदिवासी उपयोजना क्षेत्रबाहय या योजनांकरिता रु.१०.७६ कोटी असे एकूण रूपये ३०९.७६ कोटीनियतव्यय अर्थसंकल्पित आहे. मंजूर असलेल्या नियतव्ययापैकी सर्वसाधारण योजनेकरिता रूपये ९८.४० कोटी, अनुसुचित जाती उपयोजना करिता रूपये १७.४९ कोटी व आदिवासी उपयोजना क्षेत्रबाहय या योजनांकरिता रूपये ४.४९ कोटी असे एकूण रु. १२०.३८ कोटी निधी अर्थसंकल्पिय वितरण प्रणाली प्राप्त झालेला आहे. शासनाने आर्थिक मर्यादा घालून दिली आहे. तर विविध विभागाने ६४० कोटीची मागणी केली आहे. मंत्रालय स्तरावर वित्त व नियोजन मंत्र्यांच्या मार्गदर्शनात राज्यस्तरीय बैठक होईल. त्यामध्ये शासनाने घातलेली मर्यादा व प्रत्यक्ष मागणी यावरून जिल्ह्याचा २ज२५- २६ चा नियोजनाचा आराखडा ठरणार आहे. याआराखड्यामध्ये जिल्ह्यातील यंत्रणेने प्रस्तावित केलेल्या मागणीप्रमाणे निधी मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्याच्या २०२५ २६च्या मर्यादेतील आराखड्यात भरीव वाढ करण्याची शिफफारस राज्यस्तरीय बैठकीत करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. वित्त व नियोजन मंत्र्यांच्या बैठकीमध्ये आता जिल्ह्याच्या डीपीडीसीच्या अंतिम प्रारूपाला मान्यता मिळणार आहे. तत्पूर्वी, आज पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये जवाहरनगर दुर्घटनेतील मृतकांना श्रध्दांजलीवाहण्यात आली.विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने ओबीसी वस्तीगृहाचा मुददा, मत्सयबीज निर्मीतीसाठी प्रशीक्षण केंद्र उभारणे,पर्यटन स्थळांचा विकास, जलजीवनमधील प्रलंबीत कामे, वाळु धोरणानुसार नागरिकांना किफफायतीशीर दरात वाळू उपलब्ध करून देणे, आदी विषयांवर लोकप्रतिनिधींनी चर्चेत सहभाग घेतला. यासोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांबाबत व जिल्ह्यातील अंमलबजावणी बाबत यावेळी अधिकाऱ्यांसोबत उपस्थित आमदारांनी चर्चा केली. जिल्हयातील महत्वाच्या प्रश्नाविषयी जिल्हाधिका-यांनी अधिनस्त यंत्रणांची बैठक घेऊन गतीमान पध्दतीने शंभर दिवसाचा कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी, तसेच विकासकामांची वेळोवेळी माहिती स्थानिक लोकप्रतिनीधीना दयावी,याबाबतही यावेळी पालकमंत्र्यांनी निर्देशित केले. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी केले. तर सूत्रसंचालन जिल्हा नियोजन अधिकारी संजय कडु यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *