राज ठाकरेंनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर फडणवीस आयोगाने द्यावं; खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल
मुंबई:- भारतीय जनता पक्षासोबत सख्य असलेले राज ठाकरे यांनी एतच संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. झालेले मतदान कुठे गेलं? हे रहस्य असल्याचे त्यांनी भाष्य केलंय. यात त्यांनी यांच्या पक्षाचे विद्यमान आमदार राजू पाटील यांचे उदाहरण देत त्यांच्या गावातील हक्काचे मतं कुठे गेलीत? असे म्हणत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. राजू पाटील यांच्या गावातच चौदाशे मतं होती. मात्र त्यांच्या गावात एकही मत मिळूनये, हे आश्चर्यकारक असल्याचे ते म्हणालेत. दरम्यान अशाचा तक्रारी राज्यातील शेकडो गावा गावातून आल्या आहेत.
ही जादू कशी झाली हे देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक आयोगाने सांगितलं पाहिजे. अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केली आहे. महाराष्ट्र ३१ जनेवारी रोजी संकटात आहे. हे राज्य खतम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे. शिवसेना तोडायची, ठाकरे हा ब्रँड संपवायचा, ज्या नावाचं वलय आणि ताकद राज्यात आहे. त्या विरोधात दिल्लीतली सत्ता उभी आहे. अशा वेळी सातत्याने भूमिका बदलून चालणार नाही. या संदर्भात भूमिका घेणे हे सर्वच राजकीय पक्षाला महत्त्वाचा आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर फडणवीस आयोगानेचद्यायला पाहिजे, असेही खासदार संजय राऊत म्हणाले.