समाजातील दरी मिटवूयात;पंकजा मुंडेंनी मनोज जरांगेंसमोर मैत्रीचा हात पुढे केला? नेमकं काय म्हणाल्या?
बीडः- मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले नाही. लोकसभा निवडणुकीतील माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला. मी जरांगे यांना देखील सांगू इच्छिते. आपल्या समाजामधील दरी मिटवूयात. जे गोपीनाथ मुंडेंचे व्यक्तिमत्व आहे तेच माझे व्यक्तिमत्त्व आहे, असे वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.
परळी येथे आयोजित दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमातून त्या बोलत होत्या. पंकजा मुंडे म्हणाल्या की, आजचा कार्यक्रम अराजकीय नाही. मी कामापुरतं नातं जोडत नाही. ज्यांच्या बरोबर आपला विरोध होता ते आपल्या सोबत आहेत. माझे बाद मत मोजले असते तरी मी निवडून आले असते, असे भाष्य त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराजयावर केले. गोपीनाथ मुंडे विजयानंतर माझी पोरगी सर्वांवर भारी पडली, असे म्हणाले होते. त्यांनी मला थँक्यू म्हटले होते, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी सर्वांचे आभार मानले.







