भंडाऱ्यात अतिवृष्टी व हृदय थांबविणारा विजेचा कडकडाट

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- पहाटे सकाळी काही लोक फिरायला जायला निघाले. अचानक हृदय थांबविणारा विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला. तब्बल दोन तास प्रचंड विजेचा कडकडाट सुरु होता. यामुळे प्रत्येकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सोबतच मुसळधार पाऊस बरसला. भंडारा, खमारी व खोकरला मंडळात ९२ मि. मी. पाऊस पडून अतिवृष्टीची नोंद झाली. नागरीकांचे हाल झाले. भंडारा शहरात समता नगर, शास्त्री नगर, टाकळी सह अनेक सखल भागातील घरात पाणी शिरले. अचानक घरात शिरलेल्या या पाण्यामुळे अनेकांचे नुकसानझाले. तर ऐनवेळी धांदल उडाली. सविस्तर असे की, हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. काल दिवसभर व रात्री पाऊस पडलाच नाही.

मात्र अचानक पहाटे ५.०० वाजताच्या दरम्यान हृदय थांबविणारा विजेची चमचमाट व कडकडाळ सुरु झाली. सतत एक तास हे सुरु होते. यामुळे अनेकांना धास्ती भरली. घराला कंपण फुटले. सोबतच मुसळधार पाऊस सुरु झाला. जिल्ह्यात सगळीकडेच हे सुुरु होते. मात्र भंडारा शहर, खमारी मंडळ व खोकरला मंडळात ढगफुटी झाली. अनेक खोलगट भागात पाणी शिरले. समता नगर मेंढा परीसरातील प्रा. एच. एच. पारधी यांच्या घरासह अनेक घरात पाणी शिरले. शास्त्री नगर व टाकळी भागात पाणी शिरले. शास्त्री चौकाजवळील महिला समाज शाळेत पाणीच पाणी जमा झाले होते. भंडारा शहरात गडर लाईन व रस्त्याच्या बांधकामामुळे ही परिस्थिती उद्भवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *