जिल्ह्यात १२ हजार ७८६ शेतकऱ्यांकडून ४.८३ लाख क्विंटल धानाची खरेदी४,८६४ शेतकऱ्यांच्या खात्यात ४४.४९ कोटींचे चुकारे जमा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- किमान आधारभूत किंमत (हमीभाव) खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम २०२६-२७ मध्ये भंडारा जिल्ह्यात धान खरेदी प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत जिल्ह्यातील १२ हजार ७८६ शेतकऱ्यांकडून ४ लाख ८३ हजार २७९.७२ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. या धान खरेदीपोटी शेतकऱ्यांना हमीभावाने एकूण ११७ कोटी १६ लाख ८५ हजार ७९६ रुपये ५२ पैसे देय आहेत.

यापैकी २७ नोव्हेंबर २०२६ अखेर ४ हजार ८६४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाईन पद्धतीने ४४ कोटी ४९ लाख ५२ हजार ९६० रुपये ६९ पैसे जमा करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचे चुकारे थेट बँक खात्यात जमा होत असल्याने आर्थिक दिलासा मिळत असून, पुढील शेती हंगामाच्या पूर्वतयारीसाठी या निधीचा उपयोग होत आहे.

शनिवार व रविवार या सामाजिक सुट्ट्या वगळता, दररोज धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे चुकारे ४८ तासांच्या आत ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच उर्वरित शेतकऱ्यांचे चुकारे जमा करण्याची प्रक्रियाही सुरू आहे.

जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व निर्देशानुसार धान खरेदी आणि चुकारे वितरणाची प्रक्रिया सुरू असून, प्रभारी जिल्हा पणन अधिकारी एस. बी. चंद्रे यांनी ही माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *