भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीला गळतीरुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत धोकादायक अवस्थेत पोहोचली असून छताचे प्लास्टर कोसळणे, भिंतींना तडे आणि अस्वच्छता यामुळे रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. एका अपघातग्रस्ताला मदत करण्यासाठी गेलेल्या समाजसेवक पवन मस्के यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.

रुग्णालयात महिला वार्ड, प्रसूती कक्ष आणि सामान्य रुग्ण जेथे भरती आहेत. त्याच ठिकाणी इमारत कमकुवत झाल्याचे दिसून येत आहे. शासनाकडून आरोग्य विभागासाठी कोट्यवधींचा निधी दिला जात असल्याचा दावा केला जात असताना प्रत्यक्षात जिल्ह्याच्या मुख्य रुग्णालयाचीच ही अवस्था असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

छताचे प्लॉस्टर अनेक ठिकाणी निघाले असल्याने हे प्लॉस्टर पडून रुग्णांवर पुन्हा संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी याला जबाबदार कोण राहणार?

सुरक्षा ऑडिट करून तातडीने दुरुस्ती न केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *