वेतन पथकाच्या अधीक्षकांना तात्काळ निलंबित करा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- पदाचा दुरुपयोग करणाऱ्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या (माध्यमिक) अधीक्षक प्रभा दुपारे यांना सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात यावे असे पत्र जिल्हा परिषद भंडाराचे शिक्षण व बांधकाम सभापती नरेश ईश्वरकर यांनी उपसंचालकांकडे मागणी केली आहे. भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने देण्यात आलेल्या पत्राची दखल शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांनी घेतली. कार्यालयात त्या कधीच वेळेवर येत नाही. शिक्षक कर्मचाऱ्यांची कामे वेळेवर केली जात नाही.वेतन वेळेवर केले जात नाही. तसेच मुख्याध्यापकांचे वेतनवाढ रोखण्याबाबतचे सुनावणी स्वतःच्या स्वाक्षरीने सुनावणीचे पत्र काढणे या सगळ्या बाबी शिस्तभंगाच्या ठरत आहेत.
सुनावणीची तारीख २६ जुलै निर्धारीत करणे व सदर पत्र एक महिण्यानंतर वितरीत करण्यात आले. तसेच आवश्यकता नसतांना संपूर्ण व्यवस्थापक मंडळास सुनावणीस उपस्थित राहण्याच्या प्रमाण काढणे. वेळेवर सुनावणी न घेणे. शाळा संचालकांना तात्कळत ठेवणे अशाप्रकरची गंभीर वर्तणुकीमुळे २८ ऑगस्ट रोजी सुनावणीमध्ये उपस्थित झालेले संचालक जगन्नाथ बडवाईक हे कार्यालयातच मृत्यूमुखी पडल्याची गंभीर घटना घडली आहे. वेतन पथकाचे अधीक्षक प्रभा दुपारे यांचेकार्यपध्दतीबाबत नेहमीच गंभीर तक्रारी येत आहेत. त्यांची कार्यपध्दती व वर्तणूक सकारात्मक नसते.







