पवित्रस्थळांची माती व जल घेऊन निघाली कलश यात्रा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राचा गौरव व संस्कृतीच्या प्रयोजनार्थ आयोजित गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव कार्यक्रमांतर्गत मंगल कलश रथयात्रेचे आयोजन करण्यात आले. भंडारा जिल्हयातील पवित्रस्थळांची माती व जल संकलित करुन ही यात्रा निघाली असून, मुंबई येथे तिर्थक्षेत्रांची माती व जलचे पूजन केले जाणार आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत धर्म, जाती व महापुरुषांचा मान, सन्मान व विचारांसोबत महाराष्ट्र आपल्या अस्मितेसाठी प्रतिबध्द असावा,

या भावनेतून राज्यातील प्रमुख पवित्रस्थहांची माती व जल संग्रहित करुन मुंबई येथे आयोजित महाराष्ट्र दिवस कार्यक्रमात पूजन केले जाणार आहे. यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. नाना पंचबुध्दे, तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. राजूभाऊ कोरेमोरे, प्रदेश महासचिव श्री. धनंजय दलाल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. सुनिल फफुंडे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यासह मोहाडी येथील चौंडेश्वरी माता मंदिर, महादेव मंदिर गायमुख तिर्थक्षेत्र, सितासावंगी येथील नागदेव मंदिर, चांदपूर येथील हनुमान देवस्थान नरसिंग देवस्थान, डोंगरदेव महादेव मंदिर येथील माती व जल संकलित केले. पवनी येथील वैजेश्वर मंदिर (विदर्भाची काशी), धोबी तलाव मारोती मंदिर, रुयाळ सिंदपुरी येथील महासंमधी बौध्द स्तुप, लाखांदूर मांढळ येथील उत्तर वाहीनी, साकोली येथील गडकुंभली दुर्गाबाई डोह तसेच भंडारा तालुक्यातील कोरंभी माता पिंगलेश्वरी मंदिर देवस्थान येथील माती व जल संकलित केले. व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालय भंडारा येथे सर्वच तालुक्यातील तिर्थक्षेत्राचे माती व जल यांचे पुजन करण्यात आले.

ही कलश रथयात्रा भंडारा वरुन दिक्षा भूमी, नागपूर येथे ४ वाजता पोहोचणार आहे. तसेच १ मे रोजी मुंबई येथे पोहोचणार असून तेथे आयोजित समारंभात कलश पूजन करुन अखंड महाराष्ट्राची शपथ ग्रहण केली जाणार आहे. सदर कलश यात्रेच्या नियोजनात सहभाग व उपस्थितांमध्ये लोमेश वैद्य, देवचंद ठाकरे, योगेश सिंगनजुडे, सदाशिव ढेंगे, पवन चव्हाण, आरजु मेश्राम, नागेश भगत, रुपेश खवास, हितेश सेलोकर, उत्तम कळपाते, विजय सावरबांधे, छोटू बाळबुधे, चेतक डोंगरे, जितु नखाते, बालु चुन्ने, ॲड. मोहन राऊत, अंगराज समरीत, शैलेश गजभिये, अनिल टेंभरे, सुरेश बघेले, धनु व्यास, उमेश बिजेवार, राजेंद्र बघेले, श्रीराम ठाकरे, मनोज झुरमुरे, श्रीधर हिंगे, महादेव बुरडे, रोहीत बुरडे, विजय खेडीकर, सचिन उके, जुगल भोंगाडे, डॉ. रविंद्र वानखेडे, शैलेश मयुर, रिकु शर्मा, मनिष वासनिक, धनंजय ढगे, उमेश ठाकरे, राहुल निर्वाण, लोकेश नगरे, किर्ती गणविर, मंजुषा बुरडे, गणेश बाणेवार, भोजराज वाघमारे, विक्की कारेमोरे, अमन मेश्राम, मोरेश्वर राऊत, आशिष डहारे, प्रशांत सावरकर, विजय हटवार, सुरज काटोले, महादेव डोकरीमारे, मनोज शांतलवार, धनिराम भोंगाडे, सुधीर गजभिये, अमुद रामटेके, निखील हिंगे, चेतन माकडे, निरज शहारे, लता मेश्राम, निरज शहारे तसेच मोठ्या संख्येत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *