फादर अग्नल शाळेच्या मनमानी कारभार विरोधात पालकांचा आंदोलन
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर तालुक्यातील मौजा तुडका येथील फफादर अग्नल शाळेत शासनाने आदेशीत व निर्देशीत केलेल्या पाठ्यपुस्तके, शैक्षणिक शुल्क व नेमून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक असल्याने शाळेत शिकत असलेल्या त्या सात विद्यार्थ्यांच्या पालकांनी याबाबत शाळा व्यवस्थापनाला तक्रार केली असता शाळा व्यवस्थापनाकडून सात विद्यार्थ्यांना शाळेतून ट्रान्स्फर सर्टिफिकेट देऊन बाहेर काढण्यात आले त्यामुळे फादर अग्नेल शाळेकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे त्या सात चिमुकल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंदर्भात शिवसेनेकडून १६ एप्रिल रोजी आंदोलन पुकारण्यात आले होते मात्र शालेय शिक्षण विभागाने शिक्षणाधिकारी रजेवर असल्याने आंदोलन स्थगितकरून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते त्यानंतर आंदोलन तात्पुरती स्थगित करण्यात आले होते.
मात्र अद्यापही त्या सात चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेने प्रवेश दिला नाही त्यामुळे फादर अग्नेल शाळेच्या मनमानी कारभार विरोधात अन्यायग्रस्त पालकांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तुमसर पंचायत समिती कार्यालयासमोर १ मे, महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनी जन आंदोलन पुकारले आहे. याप्रकरणी जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष कविता उईके यांना निवेदन देण्यात आले. यावेळी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे विभागप्रमुख अमित एच. मेश्राम, ग्रामपंचायत सरपंच पंकज पारधी, पालक संघाचे अध्यक्ष ॲड. आशिष कुकडे, उपाध्यक्ष अनिल गभने, सचिव योगेश रंगवानी, डॉ.रुद्रसेन भजनकर, महेश पटले, सौरभ बावणे, योगेश चिंधालोरे, रविंद्र महाकाळकर, राजू ठाकूरउपस्थित होते.