दहावीच्या परीक्षेत मुलीच पुन्हा सरस गोंदिया जिल्ह्याचानिकाल ९२.०४ टक्के
या परीक्षेत मिळालेल्या गुणाच्या आधारे इयत्ता अकरावी तसेच पुढील शिक्षण विज्ञान, वाणिज्य, कला व अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखेतील प्रवेश अवलंबून असतो. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी शिक्षण मंडळाने यंदा बारावीसह दहावी परीक्षा लवकर घेऊन निकालही लवकर जाहीर केला. यंदा जिल्ह्याचा निकाल ९२.०४ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील ९,६३६ मुले व ८,८३६ मुली अशा १८,५२२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली.
यातील ८,६३५ मुली व ८,४१३ मुली असे १७,०४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ९५.२१ टक्के मुली उत्तीर्ण होत मुलांपेक्षा सरस ठरल्या असून मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ८९.१४ आहे. उल्लेखनीय म्हणजे, गोंदियाच्या विवेक मंदिर शाळेच्या विद्यार्थिनी हर्षिता मदनकर व स्वाती श्रीभाद्रे या १०० टक्के गुण मिळवून जिल्ह्यात अव्वल ठरल्या आहेत. या दोघींच्या या घवघवीत यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.निकाल लागल्यानंतर या दोघांच्या घरी शुभेच्छा देणाऱ्यांनी गर्दी केली होती.