अनुसूचित जाती विद्यार्थि्ांनीना ज्युडो कराटे प्रशिक्षणाच्या नावावर माजी जि.प.अध्यक्ष व महिला बालकल्याण सभापतींनी लाटले ८६ लाख रुपये
पुढे माहिती देताना श्रीकांत घाटबांधे म्हणाले की, तत्कालीन जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले आणि महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम व महिला व बालकल्याण अधिकारी संजय गणवीर यांनी आपल्या मजर्ीतील एनजीओ सोबत संगणमत करून ८६ लाख रुपयांची आपसात विल्हेवाट लावली आहे. तसेच गोंदिया जि.प.च्या सर्व शाळे मध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगिन विकास व्हावा म्हणून भारत देशाचे माजी पंतप्रधापन भारतरत्न अटलबिहारी बाजपेयीजी यांचे नावाने अटल क्रिडा महोत्सव सुरू केले.तेव्हा जि.प. च्या सर्व सदस्यांने एकमताने अटल क्रिडा महोत्सवाला मंजुरी प्रदान केली. परंतू अटल क्रिडा महोत्सवसाठी होणारा खर्च त्यासाठी डेकोरेशन किंवा इतर साहित्य खरेदीसाठी निविदा काढलेली नाही.
म्हणेजचभाजपा सत्तामध्ये असुन भारत देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी यांना आदर्श मानतात. आणि त्यांचेच नावाने कुठलाही खर्च पारदर्शक न करून मलाई खान्याचे काम करतात. अटल क्रिडा महोत्सवाच्या नावाने लाखो रूपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. जि. प. मध्ये ग्रामिण क्षेत्रातुन आलेला लाभाथर्ी दिवसेदिवस जि.प.च्या फेऱ्या मारत असतात, पण त्यांचे काम पुर्ण होत नाही. जि.प. म्हणजे “झोलबा पाटलाचा वाडा ‘ असे वाटु लागले आहे. म्हणजेच सत्ताधारांचा कोणत्याही अधिकाऱ्यावर नियंत्रण नाही. जि. प.चे सर्व अधिकारी, कर्मचारी आपल्या मन-मजर्ीने वागतात. ग्रामिण क्षेत्रात अनेक समस्यांचा माहेर घर आहे.पिण्याच्या पाण्याची, विजेची,रस्त्यांची, जि. प. शाळांचा, आरोग्य व्यवस्थेचा असे अनेक अनेक मुद्यावर जि. प.पदाधिकारी सत्ताधारी गांभर्ीयात नाही. म्हणजे जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर, जिल्हाभर फीरून फीरून सांगत असतात की,जि.प.चांगला काम करून अडचणी दुर करीत आहे. परंतू असे काहीही नसुन जि.प. गोंदिया ग्रामीण भागाचे प्रश्न सोडवण्यास असमर्थ असल्याचे ही श्रीकांत घाटबांधे म्हणाले.
गोंदिया जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागाद्वारा अनुसुचित जातीच्या मुली, महिला, प्राध्यापिका यांना जुडो कराटे, योगा व जिवन कौशल्य विकास प्रशिक्षण सन २०२२-२०२३ मध्ये जिल्ह्यातील अनेक शाळांमधिल मुलींना, महिलांना, प्राध्यापिकांना १२० तासाचे प्रशिक्षण पुरविले असल्याचे मातोश्री बहुउदेशिय संस्था नागपूर (एन.जी.ओ.) यांनी व इतर संस्थानी देयके सादर केलेले असुन सदर संस्थेला ३९,००,०००,०० लक्ष रुपयाचे देयके देण्यात आलेले आहे. तसेच इतर दोन संस्थाना सुद्धा देयके देण्यात आली आहे. गोंदिया जिल्हा तायक्वांडो असोशियन गोंदिया, गणपती मेश्राम, श्रृष्टी निवास पांडे ले आऊट अंगूर बगीचा गोंदिया या संस्थेला २९,००,०००/- लक्ष रुपयाचे देयके देण्यात आलेले आहे.
डी.जी.एम.तायक्वांदो क्रीडा शिक्षण आणि युवा अकादमी डी.जी.मेश्राम ह.मु.वांदेरा पो.निलज ता. देवरी जिल्हा गोंदिया किंवा संस्थान १७ लाखाचे देयक दिले आहेत. सदर संस्थांना अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत जुडो कराटे, योगा व जिवन कौशल्य प्रशिक्षण देण्याचे काम उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गोंदिया, महिला व बालकल्याण समिती यांचे संगनमताने कामे देण्यात आली. या मुद्दयांवर चौकशी करावी.अशी मागणी श्रीकांत घाटबंधे यांनी केली आहे. यावर कारवाई न झाल्यास महिला व बाल कल्याण विभागाच्या आयुक्तांना सर्व पुराव्यांशी तक्रार करण्यात येणार असे ही श्रीकांत घाटबांधे म्हणाले.