लाखनी परिसरात अवैध मुरूम माती उत्खननाला उधान
एवढा संपूर्ण बंदोबस्त केला असला तरीही तो सपाटीकरणाच्या आदेश देणारा अधिकारी कोण याची चर्चा मात्र जोरात सुरू आहे. संबंधित अधिकारी सपाटी करण्याच्या नावाने यापूर्वी अनेक ठिकाणी नावारूपास आला होता अशी चर्चा कर्मचारी वर्गात आहे यापूर्वीही या सपाटीकरण नावाच्या अधिकाèयाने अनेक महसूल विभागात करणी केली असल्याची चर्चा कर्मचारी वर्गात आहे अवैध गौण खनिज चोरी रोखण्यासाठी अनेक पथके निर्माण करण्यात आली असली तरीही महिलावर्ग मात्र सक्रिय दिसत असून पुरुष कर्मचारी पथक तेरी भी चूप या भूमिकेत वागत असल्याचे दिसून येत आहे. पोहरा -चान्ना रस्त्याच्या बाजूला २ ते ३ हजार ब्रास मुरूम जमा केल्याचे दिसून येत असून येथील महसूल अधिकारी हे धृतराष्टड्ढ च्या भूमिकेत असून जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी कानावर हात ठेवले असल्याने जिल्हाधिकारी महोदय यांनी स्वतः त्या पोहरा चान्ना रस्त्याच्या बाजूला असलेल्या २-३ हजार ब्रास मुरमाची चौकशी केल्यास मोजणी करून सबंधितावर दंड आकारल्यास मोठ्या प्रमाणावर शासनास महसूल जमा होऊ शकतो. परंतु सपाटीकरण करण्याच्या नावावर आशीर्वाद देणाèया त्या अधिकाèयावर कारवाई कोण करणार हा प्रश्न मात्र अनुत्तरीत ठरणार आहे.
गेल्या काही दिवसापासून लाखनी तालुक्यात गौण अवैधरित्या वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असून यावर अंकुश कोण घालणार? हे मात्र न समजणारे कोडे आहे तेव्हा मात्र जिल्हाधिकारी यांनी शासनाच्या महसुलावर डल्ला मारणाèया व तस्करांना मदत करणाèया अधिकाèयावर तातडीने कारवाई करावी अशी जनतेची मागणी होत आहे.