यशस्वी होण्यासाठी कठिन परिश्रम व नियोजन महत्वाचे – आल्हाद भांडारकर

दै. लोकजन वृत्तसेवा पालांदुर :- गोविंद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, पालांदुर (चौ.) येथे आयोजित स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात संस्था अध्यक्ष आल्हाद भांडारकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम व शिस्तबद्ध नियोजनाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. विद्याथ्र्यांनी जीवनात आईवडील, गुरु, मित्र आणि स्वत: या पंचसूत्रीला प्रमाणिक राहून सर्वांचा आदर करावा, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी डॉ. चंद्रकांत निंबार्ते (निमा, भंडारा) उपस्थित होते, तर प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. नीलिमाताई दिगंबर कापसे (मराठी विभाग प्रमुख, विदर्भ महाविद्यालय, लाखनी) यांनी विद्याथ्र्यांना परिश्रमाच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले. विशेष अतिथी म्हणून सरपंच लताताई कापसे, रामकृष्ण वालदे (मुख्याध्यापक, ज्ञानेश्वर विद्यालय, सालेभाटा), अंबादास धकाते (मुख्याध्यापक, गोविंद प्राथमिक विद्यालय, पालांदुर), अनिलजी बडवाईक (प्राचार्य, समर्थ कनिष्ठ महाविद्यालय, लाखनी), जितेंद्र रहांगडाले (प्राचार्य, श्रीराम विद्यालय, चीजगड), सदानंद चौधरी (मुख्याध्यापक, ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय, सालेभाटा), रूपेश नागलवाडे (मुख्याध्यापक, संत तुकाराम प्राथमिक विद्यालय, कनेरी) यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य गोवर्धनजी शेंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर विद्यार्थी प्रतिनिधी प्रणय भोयर यांनी अहवाल वाचन केले. ओंकार नंदनवार सर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले, आणि सौ. प्रतिभाताई घाटबांधे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी गुणवंत विद्याथ्र्यांचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य, शिक्षकवृंद आणि कर्मचारीवर्गाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *