
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष व साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले यांची आई स्वर्गीय मीराबाई फाल्गुनराव पटोले यांच्या निधन झाले. त्यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमानिमित्त महाराष्टड्ढाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व साकोली विधानसभा क्षेत्राचे नानाभाऊ पटोले यांच्या घरी यांच्या घरी सांत्वन भेट दिली व चर्चा केली. बाहेर सभागृहात बसल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नानाभाऊ पटोले यांनी आतमध्ये घरामध्ये सर्व कुटुंबांच्या भेटी करून दिल्या व शांतपणे भेट घेतली. या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची आई स्वर्गीय मीराबाई फाल्गुन पटोले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. अर्धा तास आतमध्ये बसल्यानंतर सरळ सुकळी येथून दुसèया ठिकाणी रवाना झाले. याप्रसंगी जिल्हा परिषद क्षेत्रात व नानाभाऊ पटोले यांच्या घरी पोलीस चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.