मकर संक्रातीला हनुमान देवस्थान चांदपूर येथे उसळणार भाविकांची गर्दी
गोंड राज्यामध्ये चांदपूर हे छोटेसे गाव छावणीच्या दृष्टीने त्यांच्या साठी महत्त्वाचे केंद्र बिंदू ठरले होते. चांदपूर गावाला सध्या जे महत्त्व आहे ते येथील स्वयंभू जागृत व पुरातन हनुमान मंदिरामुळे आहे. येथील हनुमानाची मूर्ती ७ फूट उंच असून त्याचे मुख दक्षिणेकडे तर नजर मात्र रामटेकडे आहे. येथे हनुमानाच्या दर्शनासाठी समर्थ रामदास स्वामी येऊन गेल्याचा उल्लेख आजही पुरातन दस्तएवजनात नमूद आहे. येथे दरवर्षी पोळा, ॠषिपंचमी, मकर संक्रात व हनुमान जयंतीला मोठ्या प्रमाणात यात्रा भरते हजारोच्या संख्येने भाविकांची गर्दी असते. चांदपूरच्या एका पहाडीवर चांदशहावली यांची मजार आहे. त्या ठिकाणी दरवर्षी एप्रिल महिन्यात उर्फ भरविला जातो. या ठिकाणी हिंदू मुस्लिम एकत्र येऊन धार्मिक सलोख्याचे उत्कृष्ट उदाहरण दाखवितात मकर संक्रांति निमित्त यात्रेसाठी येणाèया यात्रेकरूंना भाविकांसाठी विशेष सोय केली असल्याचे चांदपूर देवस्थान कमिटी कडून सांगितले जात आहे.