काँग्रेसचे निवडून आलेले खा.प्रशांत पडोळे  यांना चार विधानसभांमध्ये मताधिक्य वाढल्याने मिळाला विजय

दै.लोकजन वृत्तसेवा भंडाराः- लोकसभा निकालात पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने ३७ हजार ३८० मतांनी विजय मिळवत २५ वर्षांनंतर आपले खाते उघडले आहे.काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार प्रशांत पडोळे यांना एकुण ५ लाख ८७ हजार ४१३ मते मिर्ळाली, तर त्यांचे प्रतिस्पधर्ी भाजपचे उमेद्वार आणि त्याच भागातील माजी खासदार सुनील मेंढे यांना ५ लाख ५० हजार ३३ मते मिळवून पराभव पत्करावा लागला. दोघांमधील मतांच्या फरकाने काँग्रेसचे प्रशांत पडोळे ३७ हजार ३८० मते अधिक मिळवून विजयी झाले.भंडारागोंदिया लोकसभा मतदारसंघातएकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत.विधानसभा मतांची आकडेवारी पाहिली तर चार विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने भाजप उमेद्वार मेंढे यांच्यापेक्षा जास्त मते घेतली, तर दोन विधानसभा मतदारसंघात भाजपचे मेंढे पुढे होते. भंडारा विधानसभेतून काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार प्रशांत पडोळे यांना १ लाख २२ हजार ४२८ मते मिळाली, तर भाजपचे सुनील मेंढे यांना ९९ हजार ५७५ मते मिळाली. येथे काँग्रेसला २२ हजार ८५३ मतांची आघाडी मिळाली आहे. तसेच साकोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने १ लाख १७ हजार ५०१, भाजपने ९० हजार १३५ मते घेतली. येथे काँग्रेसला २७ हजार ३६६ मतांची आघाडी मिळाली आहे. तुमसर विधानसभा मतदार संघात काँग्रेसला १ लाख २२० मते मिळाली, तर भाजपला ९१ हजार २०४ मते मिळाली.

येथे काँग्रेसला ९ हजार १६ मतांची आघाडी मिळाली. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार संघात काँग्रेसला ९२ हजार ४५५ मते मिळाली तर भाजपला केवळ ७१ हजार ७९७ मते मिळाली. काँग्रेसला येथे २० हजार ६५८मतांची आघाडी मिळाली आहे. चार विधानसभा मतदार संघात काँग्रेसला ७९ हजार ८९३ मतांची आघाडी मिळाल्यानंतर गोंदिया विधानसभा मतदारसंघात भाजपचे सुनील मेंढे यांना १ लाख १० हजार ८११ मते मिळाली, तर येथे काँग्रेसला ७५ हजार ३१२ मते मिळाली.येथे भाजपला ३५ हजार ४९९ मतांची आघाडी मिळाली आहे. तसेच तिरोडा विधानसभा मतदारसंघात भाजपला ८२ हजार ७०० मते मिळाली,तर काँग्रेसला ७३ हजार ७६२ मते मिळाली. येथेही भाजप ८ हजार ९३८ मतांनी पुढे आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांना पोस्टल बॅलेटच्या ५७३५ मतांसह एकूण ५ लाख ८७ हजार ४१३ मते मिळाली, तर भाजपचे सुनील मेंढे यांना पोस्टल बॅलेटची ३८११ मते मिळून एकूण ५ लाख ५० हजार ३३ मते मिळाली. अशाप्रकारे काँग्रेसचे प्रशांतपडोळे ३७ हजार ३८० मतांनी विजयी झाले.