भंडारा पोलीस दलातर्फे ऑल आऊट ऑपरेशन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्ह्यात सर्वत्र शांतता राहावी व कोणतेही घातपाती कृत्य/अघटीत घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी या कारणाने भंडारा पोलीस दला तर्फे ऑल आऊट ऑपरेशन दिनांक १० मे रोजी सायंकाळी ७ ते रात्री १० वाजता दरम्यान प्रभारी पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात यशस्वीरित्या राबविण्यात आली. सदर ऑलआउट ऑपरेशन दरम्यान भंडारा पोलीसांनी केलेली कारवाई पुढील प्रमाणे. ऑलआऊट ऑपरेशन दरम्यान जिल्ह्यात दारूबंदी कायदा अन्वये एकुण २० कारवाई करण्यात आली असुन त्यामध्ये एकुण १,१३,७०५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. त्याच प्रमाणे जुगार कायद्यान्वये जिल्ह्यात २ कारवाई करण्यात आली असुन त्यामध्ये एकुण १२,५९० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

भंडारा जिल्हयातील ऑलआऊट ऑपरेशन दरम्यान ६९ अधिकारी व ६८८ अंमलदार हजर होते. भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन कार्यक्षेत्र अंतर्गत दारूबंदी कायदा अन्वये २० कार्यवाही, जुगार २ कार्यवाही, मोटार वाहन कायदा अन्वये १०९ केसेस, ड्रंक अँड ड्राईव्ह -०८ कार्यवाही करण्यात आल्या. कारागृहातुन सुटलेले गुन्हेगार, अभिलेखा वरील गुन्हेगार, महितीगार गुन्हेगार एकूण १३० इसम यांना त्यांची घरी चेक करण्यात आले. तसेच नाकाबंदी दरम्यान ५२६वाहने चेक करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातुन अवैध धंद्यांचा, अंमली पदार्थाचा समुळ नाश करणे करिता नागरीकांनी अवैध धंदे करणारे, अंमली पदार्थ सेवन करणारे, बाळगणारे, विक्री करणारे यांचे विरुध्द भंडारा जिल्हा पोलीसांना माहिती द्यावी, माहिती देणा-याचे नांव भंडारा जिल्हा पोलीस दला तर्फे गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन ईश्वर कातकडे सो प्रभारी पोलीस अधिक्षक भंडारा केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *