जेव्हा सहयोग हॉस्पिटल प्रशासनाने अतिक्रमण केलेल्या जागेला तोडण्याकरिता पोहोचले मुख्याधिकारी..
सदर वाद हा सहयोग हॉस्पिटल जवळील एका जागेचा आहे आणि या संदर्भात गजानन डोये यांनी नगरपरिषदेला रितसर तक्रार केलेली होती त्यामुळे गुरुवारी सदरची कारवाई करण्यात आली. सहयोग हॉस्पिटल प्रशासनाने पण सदर जागेवर ताबा सोडणार नाही करिता आपल्या परीने पूर्ण प्रयत्न केले. याकरिता हॉस्पिटल प्रशासनाचा अर्धा स्टाफ पण सदर जागेला अतिक्रमण तोडण्यास अडथळा निर्माण करण्याकरिता पाठवून देण्यात आला होता.
गुरुवारी दुपारी एक वाजता पासून सुरू झालेली सदरची कारवाई ही सायंकाळी मुख्याधिकारी संदीप चिंद्रावार यांच्या आल्यानंतर आणि त्यांनी सहयोग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना समजाविल्यानंतर संपुष्टात आली आणि अखेर सहयोग हॉस्पिटल प्रशासन सदर वाद असलेली जागा आणि त्यावर केलेले अतिक्रमण बांधकाम स्वतः आपले कर्मचारी लावून शुक्रवार पर्यंत काढून टाकणार सहयोग हॉस्पिटल प्रशासनाच्या या आश्वासनानंतर नगरपरिषद गोंदियाचे मुख्याधिकारी यांनी त्यांना शुक्रवार पर्यंत मुदत दिलेली आहे. सदर जागेवरील अतिक्रमण हे शुक्रवार पर्यत काढण्यात आले नसल्यास नगरपरिषद आपली कारवाई करण्यास मोकळी राहणार असे सहयोग हॉस्पिटल प्रशासनाला बजावण्यात आले आहे.