तालुकास्तरीय क्रिडा संमेलन सत्राच्या लेझीम नृत्यात पालोरा प्राथमिक शाळा अव्वल

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मोहाडी पंचायत समिती व शिक्षण विभागांतर्गत घेतलेल्या तिन दिवसीय क्रिडा संमेलनात जि. प. प्राथमिक शाळा पालोराच्या मुलींनी लेझिम नृत्य व शिवकन्या नृत्यात प्रथ‘ क्र‘ांक पटकाविला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे केंद्र प्रमुख कमलेश दुपारे, मुख्याध्यापक प्रमोद बोरकर, सहा शिक्षक महादेव गौपाले, आशा वाघाये, अंजली मेश्राम यांनी मुलींच्ङ्मा लेझिम नृत्य व शिवकन्या नृत्य करीता मेहनत घेतली होती. प्रथम क्रमांक पटकाविल्ङ्माबद्दल पालोरा ग्रामस्थांकडून गावातुन डी. जे. तालावर नाचत गाजत रॅली काढण्यात आली. यावेळी सरपंच शिल्पा तुमसरे, शा. व्य. सं. अध्यक्ष पुरूषोत्तम ढेंगे, उपाध्यक्ष अमरकंठ शेंडे, लेझिम चे मुख्य कर्णधार अजय निमजे, उपसरपंच रत्नदिप मेश्राम, ग्रा. पं. सदस्य श्याम तुमसरे, चंद्रकला कुंदा धार्मिक, मनिषा कुकडे, शा. व्य. सं. सदस्य ओमकार लांजेवार, सतीश ठवकर, गायत्री रेहपांडे, सविता धार्मिक, कविता तुमसरे, नेहा चिचगावकर, सा कार्यकर्ता उमेश तुमसरे, माजी ग्रा. पं. सदस्य भोजराम तिजारे, संतोष मेश्राम, तं. सं. अध्यक्ष आशिष ठवकर, रोहित बुरडे, घनश्याम तुमसरे, घनश्याम समरीत, रमेश कुकडे, केसलवाडा येथील मुख्याध्यापक कल्पेश पाटील माजी सरपंच निर्मला कुकडे, संगीता लांजेवार, सविता गोमासे, मिनाक्षी लांजेवार व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *