झुडपात बसलेल्या वाघासोबत चक्क ‘सेल्फी’
आज झुडपात वाघ असल्याचे समजताच गावकèयांनी त्या दिशेने धाव घेतली. शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थांनी त्याला अक्षरश: घेराव घालून काही उपद्रवी लोकांनी त्याच्यासोबत फोटोसेशन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. हा व्हिडीओ आता समाजमाध्यमांवर चांगलाच प्रसारित होत असून नागरिकांच्या या वागण्यामुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. ज्यामुळे आता वन विभाग अॅक्शन मोडवर आले आहे. भंडारा वन विभागाची चमू घटनास्थळी पोहोचली असून वाघाला जेरबंद करण्याची तयारी सुरू झाली आहे. वाघाला त्रास देणाèया नागरिकांवर वन्यजीव अधिनियमानुसार कडक कारवाई होणार असल्याची माहिती भंडारा उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी दिली. वाघासोबत स्वतःच्याही जिवाला नागरिकांच्या या उपद्रव्यमूल्यांमुळे धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी वाघाला त्रास दिल्यास त्यांच्यावर वन अधिनियमानुसार कडक कारवाई करण्याचा इशारा वन विभागानं दिला आहे. जनावरांची झालेली शिकार, वाघ आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी आणि नागरिकांकडून वारंवार या वाघाला त्रास दिला जात असल्याने त्याला जेरबंद करण्याची वेळ आली आहे. नागरिकांच्या उपद्रव्यमूल्यामुळेच आता या वाघाला जंगलात मुक्तसंचार करण्याऐवजी जेरबंद व्हावं लागत असल्याची खंत माजी मानद वन्यजीव रक्षक तथा वाईल्ड वॉच संस्थेचे नदीम खान यांनी व्यक्त केली आहे.