
दै. लोकजन वृत्तसेवा पवनी :- ग्रामीण रुग्णालयातून उपचार घेऊन विवाहित महिला व पती मोटारसायकल ने स्वगावाकडे परत जात असताना वैनगंगा नदीच्या पुलावर मागेहून येणाèया ट्रकने सकाळी ११.३० वाजताचे दरम्यान जबर धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाल्यामुळे भंडारा येथे उपचारासाठी रेफर करण्यात आले. अपघातात मृत पावलेल्या महिलेचे नाव दर्शना शिवशंकर चवरे (३२) असून जखमींचे नाव शिवशंकर रामदास चवरे(३८) आहे. दोघेही पती पत्नी हे पवनी तालुक्यातील इटगाव येथीलरहिवाशी असून मोटारसायकल क्रमांक एम.एच. ३६ एएफ ७३८९ ने पवनी येथे उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आले होते. नुकतीच मृतक महिलेची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रियेच्या जागेवर मलमपट्टीकरण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात आली असता मलमपट्टी करून परत जात असताना वैनगंगा नदीच्या पुलावर धानाची पोती भरलेल्या ट्रक क्रमांक एम.एच. ३४ एबी १३४४ ने मोटारसायकल ला मागेहून धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला असून महिलेचा पती हा गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी भंडारा येथे रेफर करण्यात आले आहे. अपघातग्रस्त ट्रक चालकास अटक करण्यात आली असून पुढील तपास पवनी पोलीस करीत आहे.