लाखनी तालुक्यातील १३ गावे २५ वर्षांपासून तहानलेच
कंत्राटदार व अधिकारी यांचे योग्य नियोजन नसल्याने यायोजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्याचा फफटका मात्र, एकूण १३ गावातील ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. यापूर्वी अनेकदा जल प्राधिकरण विभाग यांच्या नियंत्रणाखाली योजनेची अंमलबजावणी करण्याचे ठरले.परंतु अद्यापही कामाला सुरूवात झाली नाही. त्यामुळे महाराष्ट्र जल प्राधिकरण विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थीत होत आहे. या सर्व प्रकारामुळे तालुक्यातीलग्रामस्थ प्रशासनाच्या उदासीन कार्यपद्धतीवर नाराज आहेत. अलीकडे उन्हाळा सुरू झाला असून उन्हाच्या तीव्र झळा सामान्य नागरीक सहन करीत आहे. सोबतच नळयोजना सुरू न झाल्यामुळे पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. याचा ग्रामस्थांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. जर कुंपणच शेत खात असेल तर सामान्य जनतेने न्याय कुणाकडे मागावा अशी विवंचना तालुक्यातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.