
दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवासाठी नटवरलाल जशभाई पटेल महाविद्यालय मोहाडीच्या दोन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी रातुम नागपूर विद्यापीठाच्या संघाची निवड चाचणी प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथे घेण्यात आली. नागपूर विद्यापीठाच्या या संघात नटवरलाल जशभाई पटेल महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी प्राची झेलकर व वैष्णवी तीरमारे यांची निवड करण्यात आली आहे.त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक प्रा. अनमोल गंधे यांना दिले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल प्राचार्य डॉ. सुरेंद्र पवार, डॉ. ज्योती पांडे, डॉ. विजया राऊत, डॉ. महेश भैसारे, डॉ. प्रमोद वरकडे, प्रा. नरेश आंबिलकर, डॉ. गणेश वानखेडे, डॉ. रजनी डाकरे, प्रा. आभा सिंगनजुडे, धर्मराज डोंगरे, कन्हैया गुणेश्वर, अनिल चकोले, अजबलाल दमाहे, अभय राखडे, राहुल हेडाऊ, अभय उज्जैनवार यांनी अभिनंदन केले आहे. त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले जात आहे.