गोठ्यातील वासरावर बिबट्याचा हल्ला
दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- जवळील खडकी येथे घरातील गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला केला. यांची जाणीव लागताच घरमालक उल्हास आनंदराव रामटेके हे धावून गेल्याने वासराला जखमी करून बिबट्या पसार झाला. सविस्तर असे की, शनिवारच्या मध्यरात्री ३ वाजेच्या दरम्यान बिबट्या गोठ्यात घुसला. वापराने ओरड केल्याने उल्हास रामटेके ला आवाज आल्याने उठून पाहीले असता वासरूवर चढाओढ करतांना बिबट्या दिसल्याने काठी घेवून गेल्याने वासरू ला सोडले व उल्हास रामटेके यांच्या अंगावर धावून किरकोळ जखम करून बिबट्या पळाला. वासरु ला मोठी जखमी झाली असून उल्हास रामटेके ला किरकोळ जखम केल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रकरडी येथे उपचार करण्यात आले. नतंर घटनेची माहिती वनविभाग जांभोरा बिट चे वनरक्षक शिवाजी जुंबाड यांना माहिती दिली असता घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा मौका पंचनामा करण्यात आला.
यावेळी सरपंच अश्विन बागडे, पोलीस पाटील राजु बोंद्रे, वनमजूर जयदेव काळे, अजय गजभिये उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात जनावरांचा हैदोस असल्यामुळे सातत्याने वेळी अवेळी रात्री जुंबाड गस्ती करीत असून गावा गावात जावून रात्री च्या वेळी गावाबाहेर निघु नये याबाबत माहिती देत आहेत. तसेच बहेलीया टोळीचा अलर्ट असल्याने आपल्या श्रेत्रात कुणीही अनोळखी व्यक्ती आढळल्यास पोलीस पाटलांच्या मुसाफिर रजिस्टर मध्ये नोंद घेण्याच्या सुचना सर्व पोलीस पाटलांना देवून वन्यजीवाची सुरक्षेच्या दृष्टीने सतत काळजी घेत आहेत तसेच वनरक्षक शिवाजी जुंबाड यांनी अवैध वृक्ष तोडीवर मोठ्या प्रमाणात आळा घातलेला आहे. गंभीर वासरू चे पशुसंवर्धन अधिकारी नितीन ढोरे यांनी औषध उपचार केला असून वनविभाग कार्यालय अंतर्गत जखमी ला आर्थिक मदत देण्याची मागणी सरपंच अश्विन बागडे यांनी केली आहे.