बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढणार, राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब; राहुरीत प्राजक्त तनपुुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक, सूत्रांची माहिती
मुंबई:- केंद्रीय निवडणूक आयोगाकडून १५ मार्च रोजी तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुदूचेरी या ठिकाणच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. या निवडणुकीसोबत महाराष्ट्रातील विधानसभेच्या रिक्त जागांवर पोटनिवडणूक जाहीर होऊ शकते. भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानं अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झालेली आहे. तर, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारीला झालेल्या विमान अपघातात निधन झालं. यामुळं बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे. या दोन्ही जागांची पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. बारामतीची जागाराष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असून उपमुख्यमंंत्री सुनेत्रा पवार या जागेवर लढणार असल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे. तर राहुरीच्या जागेवर माजी आमदार प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक आहेत.






