सेतू संवाद, विशेष कार्यक्रमातून शासकीय योजनांची माहिती

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- जिल्ह्यातील विकासप्रक्रिया, प्रशासनाच्या विविध उपक्रमांची माहिती तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयातर्फे “सेतू संवाद” या विशेष कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांबाबत तसेच प्रशासनाच्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या विशेष कार्यक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्रकुमार जाधव यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत श्यामली राऊत यांनी घेतली असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत तसेच शासकीय योजनांबाबत या संवादातून माहिती देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मंगळवार, दिनांक १० मार्च २०२६ रोजी विविध भारती नागपूर १००.६ एफएम वर सकाळी ८.१५ व ९.१५ वाजता तसेच आकाशवाणी नागपूर ५८५ ज्ञकू वर सकाळी ११.१५ व दुपारी २.१५ वाजता प्रसारित होणार आहे. तसेच ही मुलाखत श्रोत्यांना छशुी जप अळी या मोबाईल ॲपवरही ऐकता येणार आहे. नागरिकांनी हा विशेष कार्यक्रम ऐकून शासनाच्या विविध योजनांची माहिती करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *