मोहगाव देवी येथे १९ ला शिवजयंतीनिमित्त भव्य जलसा

या कार्यक्रमाचे उद्घाटन आ. राजू कारेमोरे यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, सि. ए. विकास देवराव लेंडे, जि. प. उपाध्यक्ष एकनाथ फेंडर, मोहाडी पं. स. उपसभापती देवा चकोले, भंडारा पं. स. सभापती आनंद मलेवार, मोहाडी न. पं. उपाध्यक्ष सचिन गायधने, डॉ. जगदिश लेंढे, सुभाष गायधने, नरेश ईश्वरकर, जाधवराज साठवणे, रितेश वासनिक, सुधिर रामटेके, योगेश वैद्य, दिलीप गजभिये, मनोहर राखडे, संतुलाल गजभिये, धनराज साठवणे, कमलेश कनोजे यांच्यासह इतरांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष ग्यानीराम साखरवाडे, उपाध्यक्ष मनोहर साठवणे, सचिन मुलचंद आंबीलकर, कोषाध्यक्ष रामदास बालपांडे, सहसचिव धनराज शेंडे, कार्यवाही हिरालाल डोकरीमारे व सदस्यांनी केले आहे.